3रहोबाचा मुलगा हद्देजर हा सोबाचा राजा होता. फरात नदीजवळच्या आपल्या जमिनीचा ताबा घ्यायला, तिची हद्द निश्चित करायला दावीद तिकडे गेला तेव्हा त्याने या हद्देजरचा पराभव केला.
4सतराशे घोडेस्वार आणि वीसहजारांचे पायदळ त्याने सोबाचा राजा हद्देजरकडून बळकावले रथाचे शंभर घोडे वगळता सर्व घोड्यांना त्याने कुचकामी करून टाकले.
5दिमिष्कामधील अरामी लोक सोबाचा राजा हद्देजरच्या मदतीला आले. त्या बावीस हजार अरामी लोकांसही दावीदाने ठार केले.
6मग त्याने दिमिष्कातील अरामात आपले बस्थान वसवले. हे अरामी लोकही दावीदाचे अंकित झाले आणि त्यांनी खंडणी आणली. परमेश्वराने, दावीदाला तो जाईल तेथे यश दिले.
7हद्देजरच्या सैनिकांकडील सोन्याच्या ढाली दावीदाने ताब्यात घेऊन त्या यरूशलेमेला आणल्या.
8हद्देजरच्या ताब्यातील बेटा आणि बेरोथा (हद्देजरची नगरे) येथील अनेक पितळी वस्तुही दावीदाने आणल्या.
9हमाथचा राजा तोई याने हद्देजरच्या संपूर्ण सैन्याचा दावीदाने पाडाव केल्याचे ऐकले.