Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - लेवी. - लेवी. 6

लेवी. 6:2-9

Help us?
Click on verse(s) to share them!
2जर कोणी परमेश्वराविरूद्ध आज्ञेचा भंग करून पाप केले म्हणजे एखाद्याने गहाण ठेवलेली वस्तू किंवा ठेव या बाबतीत आपल्या शेजाऱ्याला फसवले किंवा लूट करून फसविले व त्याच्यावर जुलूम केला.
3किंवा आपल्या शेजाऱ्याची हरवलेली वस्तू सापडली असता सापडली नाही अशी लबाडी केली व तिच्याविषयी खोटी शपथ वाहिली, अशा ज्या गोष्टी करून लोक पाप करतात त्यापैकी एखादी करून कोणी अपराधी ठरला;
4म्हणजे असले पाप करून दोषी झाला; तर त्याने चोरलेली किंवा जुलूम करून जे घेतले असेल ते किंवा आपल्या जवळची कोणाची गहाण ठेवलेली वस्तू बूडविली असेल ती, किंवा कोणाची हरवलेली वस्तू त्यास सापडली असून त्याने परत केली नसेल ती.
5किंवा एखाद्या कामाबद्दल खोटी शपथ वाहीली तर ती त्याने पूर्ण भरून द्यावी ज्या वस्तुचा त्याने अपहार केला असेल तिची पूर्ण भरपाई आपल्या दोषार्पणाच्या दिवशी करून देऊन त्या वस्तूंच्या किंमतीचा पाचवा हिस्सा अधिक भरावा;
6त्याने परमेश्वरासाठी याजकाने सांगितलेल्या किंमतीचा एक निर्दोष मेंढा दोषार्पण म्हणून याजकापाशी आणावा;
7मग याजकाने तो मेंढा घेऊन परमेश्वरासमोर जावे व त्याच्यासाठी प्रायश्चित करावे; आणि मग ज्या अपराधामुळे तो दोषी ठरला असेल त्याची क्षमा होईल.
8परमेश्वर मोशेला म्हणाला,
9अहरोन व त्याचे पुत्र ह्यांना आज्ञा कर की होमापर्णाचे असे नियम आहेत. होमबली अग्नीकुंडावर रात्रभर ठेवून तो सकाळपर्यंत राहू द्यावा; आणि वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा.

Read लेवी. 6लेवी. 6
Compare लेवी. 6:2-9लेवी. 6:2-9