Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - लेवी. - लेवी. 20

लेवी. 20:7-16

Help us?
Click on verse(s) to share them!
7म्हणून शुद्ध व्हा! आपणास पवित्र करा! कारण मी तुमचा देव परमेश्वर आहे!
8तुम्ही माझ्या नियमांची आठवण ठेवून ते पाळा; मीच तुम्हास पवित्र करणारा परमेश्वर आहे!
9जो मनुष्य आपल्या बापाला किंवा आपल्या आईला शिव्याशाप देईल त्यास अवश्य जिवे मारावे त्याने आपल्या बापाला व आपल्या आईला शिव्याशाप दिला आहे म्हणून त्याच्या रक्तपाताची जबाबदारी त्याच्याच माथी राहील.
10जो मनुष्य आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीपाशी जातो तो मनुष्य व ती स्त्री, ते दोघेही व्यभिचाराच्या पापाचे अपराधी आहेत; त्या दोघांना अवश्य जिवे मारावे.
11जो आपल्या वडिलाच्या पत्नीपाशी जातो तो आपल्या बापाची लाज उघडी करतो! तो मनुष्य व त्याच्या बापाची पत्नी त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.
12एखादा पुरुष आपल्या सुनेशी शारीरिक संबंध ठेवेल तर त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांनी शरीरसंबंधाचे भयंकर पाप केले आहे! त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.
13एखाद्या पुरुषाने स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन केले तर ते भयंकर पाप त्या दोघांनी केले आहे म्हणून त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्याच्याच माथी राहील.
14कोणा पुरुषाने एखादी स्त्री व तिची मुलगी या दोघींबरोबर विवाह केला तर तो अतिदुष्टपणा होय. त्या पुरुषाला व त्या दोन्ही स्त्रीयांना अग्नीत जाळून टाकावे! तुमच्यामध्ये असे अतिदुष्टपणाचे पाप होऊ देऊ नये!
15कोणा पुरुषाने पशूगमन केले तर त्यास अवश्य जिवे मारावे आणि त्या पशूलाही मारुन टाकावे.
16कोणी स्त्री पशूगमन करील तर त्या स्त्रीला व त्या पशूला जिवे मारावे; त्यांना अवश्य मारुन टाकावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.

Read लेवी. 20लेवी. 20
Compare लेवी. 20:7-16लेवी. 20:7-16