Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - लेवी. - लेवी. 13

लेवी. 13:36-47

Help us?
Click on verse(s) to share them!
36तर याजकाने त्यास तपासावे व ती चाई कातडीवर पसरलेली दिसली तर पिंगट केस शोधीत न बसता त्या मनुष्यास अशुद्ध ठरवावे.
37परंतु ती चाई होती तेवढीच असेल व तिच्यावर काळे केस येत आहेत असे त्यास दिसून आले तर ती चाई बरी झाली आहे व तो मनुष्य शुद्ध झाला आहे; याजकाने त्यास शुद्ध ठरवावे.
38कोणा पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या अंगावर पांढरे डाग असतील.
39तर याजकाने ते तपासावे व त्या व्यक्तीच्या अंगावरील ते डाग करडे असतील तर ती कातडीवर फुटलेली दाद होय. ती व्यक्ती शुद्ध होय.
40कोणा मनुष्याचे केस गळून पडू लागले तर ते केवळ टक्कल आहे; तो मनुष्य शुद्ध होय.
41त्याच्या डोक्याच्या बाजूचे केस गळू लागले तरी ते एक प्रकारचे टक्कल होय; तो मनुष्य शुद्ध आहे.
42परंतु त्या टक्कल पडलेल्या डोक्यावरील चामडीवर तांबूस पांढरा चट्टा पडलेला असेल तर त्याच्या डोक्यावर महारोग फुटत आहे.
43मग याजकाने त्यास तपासावे आणि त्याच्या टक्कल पडलेल्या डोक्याच्या भागावर, अंगावरील कातडीच्या महारोगासारखा तांबूस पांढरा चट्टा पडलेला असल्याचे दिसले,
44तर त्या मनुष्याच्या डोक्यावर पडलेला चट्टा महारोगाचा होय; तो मनुष्य अशुद्ध होय; याजकाने त्यास अशुद्ध ठरवावे.
45ज्या मनुष्यास महारोग झालेला आहे त्याचे कपडे फाटके असावे; त्याने आपले केस मोकळे सोडावे, आपले तोंड झाकावे व इतर लोकांस इशारा देण्यासाठी अशुद्ध, अशुद्ध असे ओरडत जावे.
46जोपर्यंत त्याच्या अंगावर चट्टा असेल तितक्या दिवसापर्यंत त्याने अशुद्ध रहावे; तो अशुद्ध होय; त्याने एकटे रहावे; त्याची वस्ती छावणीबाहेर असावी.
47“एखाद्या लोकरीच्या किंवा सणाच्या वस्त्राला महारोगाचा चट्टा पडला,

Read लेवी. 13लेवी. 13
Compare लेवी. 13:36-47लेवी. 13:36-47