25मुंग्या अगदी लहान आणि दुर्बल असतात, पण तरीही त्या उन्हाळ्यात आपले अन्न साठवतात.
26ससे हे सशक्त प्राणी नाहीत, पण ते खडकात आपले घर करतात.
27टोळांना राजा नसतो, पण तरीही ते सर्व टोळीटोळीने बाहेर जातात.
28पाल आपण हातानी पकडू शकतो, तरी ती राजाच्या महालात सापडते.
29जे आपल्या चालण्यात डौलदार असतात असे तीन प्राणी आहेत, चौघांची आपली चालण्याची ढब सुरेख आहे,
30सिंह सर्व प्राण्यात सगळ्यात बलवान आहे तो कोणापासूनही मागे फिरत नाही.
31गर्वाने चालणारा कोंबडा, बोकड; आणि ज्याचे सैन्य त्याच्याजवळ आहे असा राजा.