9तुमचे आणि तुमच्या शेजाऱ्याचे वाद आपसात चर्चा करून मिटव, आणि दुसऱ्याच्या गुप्त गोष्टी उघड करू नको.
10केली तर कदाचित ऐकणारा तुझी अप्रतिष्ठा करील, व हे दूषण तुला लागून राहील.
11जसे रुपेरी तबकात सोन्याचे सफरचंद, तसे निवडक चांगले शब्द बोलणे.
12जसे सोन्याची अंगठी किंवा दागिना शुद्ध सोन्यापासून करतात, तसाच दोष देणारा सुज्ञ ऐकणाऱ्याच्या कानांना आहे.
13कापणीच्या समयी जसे बर्फाचे पेय, तसा विश्वासू दूत त्यास पाठवणाऱ्याला आहे कारण तो आपल्या धन्याचा जीव गार करतो.
14जे लोक भेटी देण्याचे वचन देतात पण देत मात्र कधीच नाहीत, ते पाऊस न आणणारे ढग आणि वारा यांसारखे आहेत.
15धीर धरल्याने राज्य करणाऱ्याचे मन वळते, आणि मऊ जीभ हाड फोडते.
16जर तुला मध सापडला तर तुला पुरे इतकाच खा; जास्त खाल्ला तर तू ओकून टाकशील.
17शेजाऱ्याच्या घरात सारखे जाऊ नका, जर गेलात तर तो कंटाळून तुमचा तिरस्कार करायला लागेल.
18जो कोणी मनुष्य आपल्या शेजाऱ्याविरूद्ध खोटी साक्ष देतो. जसे युद्घात सोटा, तलवार किंवा तीक्ष्ण बाण वापरतात यांसारखा तो आहे.
19संकटकाळी अविश्वासणाऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवणे, हे तुटलेल्या दाताने खाणे किंवा लचकलेल्या पायाने चालणे ह्यासारखे आहे.
20जो कोणी दु:खी हृदयापुढे गीत गातो, तो थंड हवामानात अंगावरील कपडे काढून टाकण्यासारखा, आणि सोड्यावर टाकलेल्या शिरक्यासारखा आहे.