Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - नीति. - नीति. 25

नीति. 25:1-11

Help us?
Click on verse(s) to share them!
1ही शलमोनाची आणखी काही नीतिसूत्रे आहेत. यहूदाचा राजा हिज्कीया याच्या मनुष्यांनी याचा नक्कल केली.
2काही गोष्टी गुपित ठेवणे यामध्ये देवाचे गौरव आहे, पण त्या गोष्टी शोधून काढणे यामध्ये राजाचे गौरव आहे.
3जसे उंचीमुळे आकाशाचा आणि खोलीमुळे पृथ्वीचा, तसे राजाचे मन गूढ आहे.
4रुप्यातला गाळ काढून टाक, आणि धातू कामगार रुप्याचा उपयोग त्याच्या कामासाठी करू शकेल.
5त्याचप्रमाणे राजाच्या सानिध्यापासून दुष्टांना दूर कर म्हणजे त्याचे राजासन जे काही चांगले आहे त्यांनी भक्कम होईल.
6राजासमोर स्वत:ची प्रतिष्ठा मिरवू नको. आणि थोर अधिकाऱ्यांच्या जागी उभा राहू नको.
7कारण तुझ्यासमोर येणाऱ्या अधिपतीपुढे तुझा पाणउतारा करण्यापेक्षा, “वर येऊन बस” असे तुला म्हणावे हे अधिक चांगले आहे.
8फिर्याद करायला जाण्याची घाई करू नको. ती तू केलीस तर शेवटी तुझ्या शेजाऱ्याने तुला लज्जित केले तर परिणामी काय करू असे तुला होऊन जाईल.
9तुमचे आणि तुमच्या शेजाऱ्याचे वाद आपसात चर्चा करून मिटव, आणि दुसऱ्याच्या गुप्त गोष्टी उघड करू नको.
10केली तर कदाचित ऐकणारा तुझी अप्रतिष्ठा करील, व हे दूषण तुला लागून राहील.
11जसे रुपेरी तबकात सोन्याचे सफरचंद, तसे निवडक चांगले शब्द बोलणे.

Read नीति. 25नीति. 25
Compare नीति. 25:1-11नीति. 25:1-11