1ज्याला शिक्षण प्रिय त्यास ज्ञान प्रिय, परंतु जो कोणी शासनाचा द्वेष करतो तो मूर्ख आहे.
2परमेश्वर चांगल्या मनुष्यास कृपा देतो, पण वाईट योजना करणाऱ्याला तो दोषी ठरवतो.
3दुष्टतेने मनुष्य स्थिर होत नाही, पण नीतिमानाचे उच्चाटण होणार नाही.
4सद्गुणी पत्नी आपल्या पतीचा मुकुट आहे, परंतु जी कोणी लाज आणणारी ती त्याची हाडे सडविणाऱ्या रोगासारखी आहे.
5नीतिमानाच्या योजना यथान्याय असतात, पण दुष्टांचा सल्ला कपटाचा असतो.
6दुष्टांचे शब्द रक्तपात घडून आणण्यासाठी दबा धरून थांबतात, परंतु न्यायीचे शब्द त्यास सुरक्षित ठेवतात.
7दुर्जन उलथून टाकले जातात आणि नाहीसे होतात, पण नीतिमानाचे घर टिकते.
8मनुष्याची प्रशंसा त्याच्या सुज्ञतेप्रमाणे होते, पण जो विकृत निवड करतो त्याचा तिरस्कार होतो.
9जो आपणास प्रतिष्ठित दाखवतो पण त्याच्याकडे अन्न नसते; त्यापेक्षा ज्याची प्रतिष्ठा बेताची असून फक्त सेवक असतो तो चांगला समजायचा.