21नीतिमानाचे ओठ पुष्कळांचे पोषण करतात, पण मूर्ख मरतात कारण त्यांच्यात बुद्धीचा अभाव असतो.
22परमेश्वराचे आशीर्वाद चांगली संपत्ती आणते, आणि त्यामध्ये तो अधिक दुःख देत नाही.
23दुष्कर्म करणे मूर्खाला खेळ असे आहे, परंतु सुज्ञ मनुष्यास ज्ञानात आनंद आहे.
24दुष्ट ज्याला भितो ते त्याच्यावर येईल, पण नीतिमानाची इच्छा मान्य होईल.
25दुष्ट वावटळीसारखे आहेत ती येऊन जाते आणि तसा तो नाहीसा होतो, पण जो चांगले करतो तो सर्वकाळ टिकणाऱ्या पायासारखा आहे.
26जशी आंब दातांना आणि जसा धूर डोळ्यांना, तसा आळशी त्यास पाठवणाऱ्यांना आहे.
27परमेश्वराचे भय आयुष्याचे दिवस वाढवते, पण दुष्टाचे वर्ष कमी होतील.
28नीतिमानाची आशा त्यांचा आनंद होईल, पण दुष्टाची वर्षे कमी होतील.