4तुझी मान दाविदाने शस्रगारासाठी बांधलेल्या मनोऱ्याप्रमाणे आहे. ज्याच्यावर सैनिकांच्या एक हजार ढाली व कवचे लटकत आहेत.
5हरीणीची जी जुळी, जे दोन पाडस कमलपुष्पांच्यामध्ये चरतात त्यांच्यासारखी तुझी दोन वक्षस्थळे आहेत.
6दिवस शेवटच्या घटका मोजत आहेत आणि सावल्या दूर पळत आहेत. तेवढ्या वेळात मी त्या गंधरसाच्या पर्वतावर, ऊदाच्या टेकडीवर जाईन.
7प्रिये, तू सगळीच फार सुंदर आहेस. तुझ्यात कुठेही काहीही दोष नाही.