Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - 2 राजे - 2 राजे 13

2 राजे 13:10-15

Help us?
Click on verse(s) to share them!
10यहोआहाजाला मुलगा योवाश शोमरोनात इस्राएलच्या राजा झाला. यहूदाचा राजा योवाश याचे ते सदतिसावे वर्ष होते. योवाशाने इस्राएलवर सोळा वर्षे राज्य केले.
11परमेश्वराने जे जे करु नका म्हणून सांगितले ते सर्व त्याने केले. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलाला जी पापे करायला लावली ती करण्याचे योवाशाने सोडले तर नाहीच, उलट तोसुध्दा त्याच मार्गाने गेला.
12इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात, योवाशाने केलेले पराक्रम आणि यहूदाचा राजा अमस्या याच्याशी झालेल्या लढाया यांची हकिकत आलेली आहे.
13योवाशाच्या निधनानंतर त्याचे आपल्या पूर्वजांशेजारी दफन झाले. यराबाम सिंहासनावर आला आणि योवाशाचे शोमरोनात इस्राएलच्या राजांबरोबर दफन झाले.
14आता अलीशा तर आजारी पडला व त्या आजारातच पुढे तो मरण पावला. तेव्हा इस्राएलाचा राजा योवाश त्यास भेटायला गेला आणि अलीशाबद्दल दु:खातिशयाने त्यास रडू आले. योवाश म्हणाला, “माझ्या बापा, माझ्या बापा, इस्राएलचा रथ व त्याचे स्वार तुला घेण्यासाठी आले.”
15तेव्हा अलीशा योवाशाला म्हणाला, “धनुष्य आणि काही बाण घे.” तेव्हा योवाशाने धनुष्य व काही बाण घेतले

Read 2 राजे 132 राजे 13
Compare 2 राजे 13:10-152 राजे 13:10-15