Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - लेवी. - लेवी. 5

लेवी. 5:2-6

Help us?
Click on verse(s) to share them!
2किंवा कोणी अशुद्ध वस्तुला किंवा मरण पावलेल्या वनपशुला किंवा अशुद्ध मानलेल्या पाळीव प्राण्याला किंवा सरपटणाऱ्या अशुद्ध प्राण्याच्या शवाला जरी नकळत शिवल्यामुळे अशुद्ध झाला तर तो दोषी ठरेल.
3त्याचप्रमाणे मनुष्याशी संबध असलेल्या एखाद्या अशुद्ध वस्तुला नकळत स्पर्श केला व आपण अशुद्ध झालो आहो असे त्यास नंतर कळाले तर तो दोषी ठरेल.
4किंवा एखादी बरी किंवा वाईट गोष्ट करण्यासंबंधी कोणी आपल्या ओठांद्वारे अविचाराने शपथ घेतली आणि नंतर ती पूर्ण करण्यास तो विसरला; परंतु नंतर त्यास ती आठवली तर आपली शपथ पूर्ण न केल्यामुळे तो दोषी होईल.
5तो अशा कोणत्याही गोष्टीविषयी दोषी ठरला तर त्याने पाप केलेली बाब कबूल करावी;
6आणि केलेल्या पापाबद्दल परमेश्वरासमोर त्याने दोषार्पण म्हणून कोकरांची किंवा करडांची एक मादी कळपातुन आणावी; आणि मग याजकाने त्या मनुष्याच्या पापाबद्दल प्रायश्चित करावे.

Read लेवी. 5लेवी. 5
Compare लेवी. 5:2-6लेवी. 5:2-6