Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - लेवी. - लेवी. 13

लेवी. 13:15-27

Help us?
Click on verse(s) to share them!
15याजकाने कोवळे मांस पाहून त्यास अशुद्ध ठरवावे; असले कोवळे मांस अशुद्धच असते; तो महारोग होय.
16परंतु ते कोवळे मांस जर परत पांढरे झाले तर त्याने परत याजकाकडे यावे;
17याजकाने पुन्हा त्यास तपासावे आणि जर त्याचा चट्टा परत पांढरा झाला असेल तर त्याने त्या मनुष्यास शुद्ध ठरवावे; तो शुद्ध आहे.
18कोणाच्या कातडीला फोड येऊन तो बरा झाला
19व फोडाच्या जागी पांढरी सूज आली किंवा पांढरा तकतकीत लाल रेषा असलेला डाग पडला तर त्याने तो याजकाला दाखवावा.
20याजकाने त्यास तपासावे आणि जर ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली दिसली व त्यावरील केस पांढरे झाले असले तर त्याने त्यास अशुद्ध ठरवावे; फोडातून बाहेर पडलेला हा महारोगाचा चट्टा आहे.
21पण तपासणी केल्यावर त्यावरचे केस पांढरे झालेले नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली नाही तसेच ती बुजून पुसट होत चाललेली आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्यास सात दिवस वेगळे ठेवावे.
22त्यानंतर तो कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याजकाने त्या मनुष्यास अशुद्ध ठरवावे; तो चट्टा आहे.
23पण तो तकतकीत डाग तेथल्या तेथेच राहून पसरला नाहीतर तो फोडाचा वण आहे, म्हणून याजकाने त्या मनुष्यास शुद्ध ठरवावे.
24एखाद्याच्या कातडीत जळाल्याचा वण असेल व त्या वणाच्या कोवळ्या मांसात तांबूस-पांढरा किंवा पांढरा डाग दिसून येईल.
25तर याजकाने त्यास तपासावे; त्या तकतकीत डागावरील केस पांढरे झाले असतील व कातडीपेक्षा ती जागा खोल गेलेली दिसत असेल तर त्या जळलेल्या जागी महारोग फुटला आहे; मग याजकाने त्यास अशुद्ध ठरवावे; तो महारोगाचा चट्टा होय.
26परंतू तपासल्यावर त्या डागावरचे केस पांढरे झालेले नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली नाही आणि ती पुसट होत चालली आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्यास सात दिवस वेगळे ठेवावे.
27सातव्या दिवशी त्याने त्यास तपासावे व त्याचा डाग कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याजकाने त्या मनुष्यास अशुद्ध ठरवावे; तो महारोगाचा चट्टा होय;

Read लेवी. 13लेवी. 13
Compare लेवी. 13:15-27लेवी. 13:15-27