Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - लेवी. - लेवी. 11

लेवी. 11:9-18

Help us?
Click on verse(s) to share them!
9“जलाशयात, समुद्रात व नद्यात संचार करणाऱ्या ज्या प्राण्यांना पंख व खवले आहेत ते तुम्ही खावे.
10जलचरापैकी समुद्रात व नद्यात संचार करणाऱ्या ज्या प्राण्यांना पंख आणि खवले नाहीत असे प्राणी तुम्ही खाऊ नये; परमेश्वराच्या दृष्टीने ते अयोग्य आहेत.
11ते तुम्ही अयोग्य समजावे; त्यांचे मांस खाऊ नये; त्यांच्या शवांना देखील शिवू नये.
12जलाशयातल्या ज्या प्राण्यांना पंख व खवले नाहीत ते देवाच्या दृष्टीने खाण्यास योग्य नाहीत ते ओंगळ समजावे.”
13देवाच्या दृष्टीने अशुद्ध प्राण्याप्रमाणेच अशुद्ध असलेले म्हणून खाऊ नयेत ते पक्षी असे; गरुड, गीध, कुरर,
14घार, निरनिराळ्या जातीचे ससाणे,
15निरनिराळ्या जातीचे कावळे,
16शहामृग, गवळण, कोकीळ, निरनिराळ्या जातीचे बहिरी ससाणे,
17पिंगळा, करढोक, मोठे घुबड,
18पांढरे घुबड, पाणकोळी, गिधड,

Read लेवी. 11लेवी. 11
Compare लेवी. 11:9-18लेवी. 11:9-18