Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - यहो. - यहो. 13

यहो. 13:1-6

Help us?
Click on verse(s) to share them!
1आता यहोशवा म्हातारा आणि चांगल्या उतारवयाचा झाला होता. तेव्हा परमेश्वर त्याच्याशी म्हणाला, “तू म्हातारा झाला आहेस आणि तुझे वय पुष्कळ झाले आहे, परंतु अजून पुष्कळ देश काबीज करून घ्यावयाचा राहिला आहे.”
2हा देश अजून बाकी राहिला आहे: पलिष्ट्यांचा सर्व प्रांत, आणि सर्व गशूरी प्रांत;
3मिसराच्या पूर्वेस जी शीहोर नदी तिजपासून उत्तरेस जे एक्रोन त्याच्या सीमेपर्यंत ही जो देश, तो कनान्यांचा मानलेला आहे; गज्जी व अश्दोदी, अष्कलोन, गथी व एक्रोनी व अव्वी यांचे पलिष्टी पाच सुभेदार आहेत.
4दक्षिणेस कनान्यांचा सर्व देश, आणि सीदोन्याचे मारा, अफेक व अमोऱ्यांच्या सीमेपर्यंतचा देश;
5आणि गिबली यांचा देश, व सूर्याच्या उगवतीस सर्व लबानोन, हर्मोन डोंगराखालच्या बाल-गादापासून हमाथात जायच्या ठिकाणापर्यंत तो देश घ्यायचा आहे;
6लबानोनापासून मिस्रफोथ माइमापर्यंत डोंगराचे सर्व राहणारे, सर्व सीदोनी, यांस मी इस्राएलाच्या संतानापुढून वतनातून बाहेर घालवीन; त्यांचा देश इस्राएलाचे वतन होण्यास मी तुला आज्ञा दिल्याप्रमाणे चिठ्ठ्या टाकून वाटून दे.

Read यहो. 13यहो. 13
Compare यहो. 13:1-6यहो. 13:1-6