Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - यहो. - यहो. 11

यहो. 11:2-9

Help us?
Click on verse(s) to share them!
2आणि तसेच उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशांत, किन्नेरोथाच्या दक्षिणेकडील अराबात. तळवटीत आणि पश्चिमेकडील दोरात असलेल्या राजांना,
3आणि पूर्वेकडले व पश्चिमेकडले कनानी, तसेच अमोरी, हित्ती, परिज्जी व डोंगरवटीतले यबूसी आणि हर्मोन डोंगराच्या तळाशी मिस्पा प्रातांत राहणारे हिव्वी यांना बोलावणे पाठवले.
4तेव्हा त्यांचे सर्व सैन्य समुद्रकिनाऱ्यावरील वाळूसारखा अगणित समुदाय घेऊन निघाले. त्यांच्याबरोबर पुष्कळ घोडे व रथ होते.
5या सर्व राजांनी एकत्र जमून इस्राएलाशी लढावयास मेरोम सरोवराजवळ तळ दिला.
6मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “त्यांच्या उपस्थितीला भिऊ नको, कारण उद्या मी या वेळी त्या सर्वांना इस्राएलाच्या हाती देऊन मारणार आहे. त्यांच्या घोड्यांच्या घोडशिरा तोडून टाक व त्यांचे रथ अग्नीत जाळून टाक.”
7तेव्हा यहोशवा आपल्या सर्व योद्ध्यांसह मेरोम पाण्याजवळ अकस्मात येऊन त्यांच्यावर तुटून पडला.
8परमेश्वराने त्यांना इस्राएलाच्या हाती दिले; त्यांनी त्यांना मार देऊन सीदोन महानगरापर्यंत व मिस्रफोथ माईमापर्यंत आणि पूर्वेस मिस्पा खोऱ्यापर्यंत पाठलाग करून त्यांचा एवढा संहार केला की त्यातला एकही जिवंत राहिला नाही.
9परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यहोशवाने केले, म्हणजे त्यांच्या घोड्यांच्या घोडशिरा तोडल्या व त्यांचे रथ अग्नीत जाळून टाकले.

Read यहो. 11यहो. 11
Compare यहो. 11:2-9यहो. 11:2-9