Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - प्रेषि. - प्रेषि. 9

प्रेषि. 9:18-31

Help us?
Click on verse(s) to share them!
18लागलीच खपल्यासारखे काहीतरी शौलाच्या डोळ्यावरून खाली पडले, आणि त्यास पुन्हा दृष्टी आली शौल तेथून उठल्यावर त्याचा बाप्तिस्मा करण्यात आला.
19नंतर त्याने अन्न सेवन केल्यावर त्याच्या अंगात शक्ती आली, शौल काही दिवस दिमिष्क येथील शिष्यांबरोबर राहिला.
20यानंतर सरळ सभास्थानात जाऊन शौल येशूच्या नावाची घोषणा करू लागला, येशू हा देवाचा पुत्र आहे.
21ज्या लोकांनी शौलाचे बोलणे ऐकले त्या सर्वांना मोठे नवल वाटले ते म्हणाले, “यरूशलेम शहरातील ज्या लोकांचा येशूच्या नावावर विश्वास आहे, त्या सर्वाचा नाश करू पाहणारा हाच नाही काय? तो येशूच्या अनुयायांना अटक करण्यासाठी येथे आला आहे व तो त्यांना यरूशलेम शहरातील मुख्य याजकांसमोर उभे करणार आहे.”
22परंतु शौल अधिकाधिक सामर्थ्यशाली होत गेला, त्याने हे सिद्ध केले की, येशू हाच ख्रिस्त आहे आणि त्याचे पुरावे इतके सबळ होते. दिमिष्क येथील यहूदी त्याच्याबरोबर वाद घालू शकले नाहीत.
23काही दिवसानंतर, यहूदी लोकांनी शौलाला जिवे मारण्याचा कट रचला.
24यहूदी रात्रंदिवस शहराच्या वेशीवर पहारा देत होते व शौलाला पकडण्याची वाट पाहत होते. त्यांना शौलाला ठार मारायचे होते, पण त्यांचा हा बेत शौलास समजला.
25एके रात्री शौलाने ज्यांना शिक्षण दिले होते अशा काही अनुयायांनी शहरातून जाण्यासाठी शौलाला मदत केली, अनुयायांनी शौलाला एका टोपलीत ठेवले, नंतर त्यांनी टोपली गावकुसावरून रात्रीच्या वेळी खाली सोडली.
26नंतर शौल यरूशलेमे शहरास गेला तेथील विश्वास ठेवणाऱ्यांच्या परिवारात मिसळण्याचा त्याने प्रयत्न केला, पण ते त्यास घाबरत होते, त्यांचा विश्वासच बसत नव्हता, शौल खरोखर येशूचा शिष्य झाला आहे.
27परंतु बर्णबाने शौलाचा स्वीकार केला व त्यास घेऊन प्रेषितांकडे गेला. बर्णबाने सांगितले की, शौलाने येशूला दिमिष्कच्या रस्त्यावर पाहिले आहे, येशू त्याच्याशी कसा बोलला हेही त्याने सविस्तरणे सांगितले, मग त्याने प्रेषितांना सांगितले की, येशूविषयीची सुवार्ता शौलाने मोठ्या धैर्याने दिमिष्क येथील लोकांस सांगितली.
28मग शौल अनुयायांसह तेथे राहिला, तो यरूशलेम शहरामध्ये सगळीकडे गेला. व धैर्याने प्रभूची सुवार्ता सांगू लागला.
29शौल नेहमी ग्रीक भाषा बोलणाऱ्या यहूदी लोकांशी बोलत असे तो त्यांच्याशी वादविवाद करीत असे, पण ते त्यास मारण्याचा प्रयत्न करीत होते.
30जेव्हा बंधुजनांना हे कळाले तेव्हा त्यांनी त्यास कैसरीया येथे नेले, व नंतर तेथून त्यास तार्सास पाठवले.
31अशाप्रकारे सर्व यहूदिया, गालील प्रांत, शोमरोन या प्रदेशातील मंडळीस तेथे शांती लाभली; आणि, मंडळी पवित्र आत्म्याच्या सांत्वनेत व परमेश्वराच्या भयात वाढत गेली.

Read प्रेषि. 9प्रेषि. 9
Compare प्रेषि. 9:18-31प्रेषि. 9:18-31