Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - प्रेषि. - प्रेषि. 16

प्रेषि. 16:11-17

Help us?
Click on verse(s) to share them!
11तेव्हा त्रोवसापासून हाकारून आम्ही नीट समथ्राकेस बेटाला गेलो व दुसऱ्या दिवशी नियापुलीस शहरास गेलो.
12तेथून फीलिप्पै शहरास गेलो; ते मासेदोनियाचे या भागातले पहिलेच नगर असून तेथे रोमन लोंकाची वसाहत आहे त्या नगरात आम्ही काही दिवस राहीलो.
13मग शब्बाथ दिवशी आम्ही वेशीबाहेर नदीकाठी, जेथे प्रार्थना होत असते असे आम्हास वाटले तेथे जाऊन बसलो; आणि ज्या स्त्रिया तेथे जमल्या होत्या त्यांच्याबरोबर बोलू लागलो.
14तेथे लुदिया नावाची कोणीएक स्त्री होती; ती थुवतीरा नगराची असून जांभळी वस्त्रे विकीत असे; ती देवाची उपासना करणारी होती, तिने आमचे भाषण ऐकले; तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की, पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले.
15मग तिचा व तिच्या घराण्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तिने अशी विनंती केली की, “मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे असे जर तुम्ही मानीत आहात तर माझ्या घरी येऊन राहा.” तिच्या आग्रहास्तव ती विंनती आम्हास मान्य करावी लागली.
16मग असे झाले की, आम्ही प्रार्थना स्थळाकडे जात असता कोणीएक दुष्ट आत्मा लागलेली मुलगी आम्हास आढळली, तिच्या अंगात येत असे, ती दैवप्रश्न सांगून आपल्या धन्यांना पुष्कळ मिळकत करून देत असे.
17ती पौलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने म्हणाली, “हे लोक परात्पर देवाचे दास आहेत, हे आपणाला तारणाचा मार्ग कळवितात.”

Read प्रेषि. 16प्रेषि. 16
Compare प्रेषि. 16:11-17प्रेषि. 16:11-17