15ह्यासाठी मी तुला भेटायला, तुझे मुख पाहायला उत्सुकतेने बाहेर आले आणि तू मला सापडला आहेस.
16मी आपल्या अंथरुणावर, मिसरातली रंगीत सुती चादर पसरली आहे.
17मी आपले अंथरुण बोळ, अगरू, दालचिनी यांनी सुवासिक केली आहे.
18ये, आपण सकाळपर्यंत प्रीतीने भरून तृप्त होऊ; आपण वेगवेगळ्या कृतींनी प्रेम करून महान आनंद घेऊ.
19माझा पती घरी नाही; तो लांबच्या प्रवासास गेला आहे.