Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - नीति. - नीति. 3

नीति. 3:4-17

Help us?
Click on verse(s) to share them!
4म्हणजे तुला देवाच्या व मनुष्याच्या दृष्टीने कृपा व सुकीर्ती ही मिळतील.
5तू आपल्या सर्व अंतःकरणाने परमेश्वरावर विश्वास ठेव. आणि तुझ्या स्वत:च्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस;
6तुझ्या सर्व मार्गात त्याची जाणीव ठेव, आणि तो तुझ्या वाटा सरळ करील.
7तू आपल्याच दृष्टीने ज्ञानी असू नकोस; परमेश्वराचे भय धर आणि वाईटापासून दूर राहा.
8हे तुझ्या शरीराला आरोग्य आणि तुझ्या हाडांना सत्व असे होईल.
9तुझ्या संपत्तीने आणि आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथमफळाने परमेश्वरास मान दे,
10त्याने तुझी कोठारे समृद्धीने भरतील आणि तुझी पिंपे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील.
11माझ्या मुला, परमेश्वराची शिस्त तुच्छ मानू नको, आणि त्याच्या शासनाचा द्वेष करू नकोस,
12जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला शिक्षा करतो, तसा परमेश्वर ज्यांच्यावर प्रीती करतो त्यांनाच तो शिस्त लावतो.
13ज्या कोणाला ज्ञान सापडले तो सुखी आहे, त्यास ग्रहणशक्ती सुद्धा प्राप्त होते.
14ज्ञानापासून जी काय वाढ होते त्याची प्राप्ती परत मिळणाऱ्या रुप्याच्या प्राप्तीपेक्षा चांगली आहे, आणि त्याचे फायदे उत्कृष्ट सोन्यापेक्षा चांगले आहेत.
15ज्ञान रत्नांपेक्षा अधिक मौल्यवान आहे. आणि तुम्ही त्यांची अपेक्षा कराल त्याची तुलना तिच्याशी होऊ शकणार नाही.
16तिच्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य आहे, तिच्या डाव्या हातात संपत्ती आणि सन्मान आहेत.
17तिचे मार्ग दयाळूपणाचे मार्ग आहेत, आणि तिच्या सर्व वाटा शांतीच्या आहेत.

Read नीति. 3नीति. 3
Compare नीति. 3:4-17नीति. 3:4-17