20हा व्यभिचारी स्त्रिचा मार्ग असा आहे; ती खाऊन तोंड पुसते, आणि म्हणते मी काही चुकीचे केले नाही.
21तीन गोष्टीने पृथ्वी कांपते, आणि चार गोष्टी तिला सहन होत नाहीत.
22जेव्हा दास राजा होतो, अन्नाने तुडुंब पोट भरलेला मूर्ख;
23विवाह झालेली त्रासदायक स्त्री; मालकिणीची वारस झालेली दासी.
24पृथ्वीवरच्या चार गोष्टी अगदी लहान आहेत; पण त्या अतिशय शहाणपणाच्या आहेत.
25मुंग्या अगदी लहान आणि दुर्बल असतात, पण तरीही त्या उन्हाळ्यात आपले अन्न साठवतात.
26ससे हे सशक्त प्राणी नाहीत, पण ते खडकात आपले घर करतात.