8जो कोणी ज्ञान मिळवतो तो आपल्या जिवावर प्रेम करतो, जो कोणी सुज्ञता सांभाळतो त्यास जे काही चांगले आहे ते मिळेल.
9खोटी साक्ष देणाऱ्याला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही, पण जो कोणी लबाड्या करतो त्याचा नाश होईल.
10मूर्खाला आलिशानपणा शोभत नाही, तसे सरदारांवर राज्य करणे गुलामाला कितीतरी कमी शोभते.
11बुद्धीने मनुष्य रागास मंद होतो, आणि अपराधाकडे दुर्लक्ष करणे त्याची शोभा आहे.
12राजाचा राग सिंहाच्या गर्जनेसारखा आहे, पण त्याचा उपकार गवतावर पडलेल्या दहिवरासारखे आहे.
13मूर्ख मुलगा आपल्या वडिलांना अरिष्टासारखा आहे; आणि भांडखोर पत्नी सतत गळणाऱ्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे आहे.
14घर व संपत्ती आईवडीलांकडून आलेले वतन आहे, पण समंजस पत्नी परमेश्वरापासून आहे.
15आळशीपणा आपणाला गाढ झोपेत टाकतो, पण ज्याला काम करण्याची इच्छा नाही तो उपाशी जातो.