17जो कोणी गरीबावर दया करतो तो परमेश्वरास उसने देतो, आणि तो त्याने जे काही केले त्याची परतफेड करील.
18काही आशा असेल तर आपल्या मुलाला शिक्षा कर, आणि त्याच्या मरणाची तुझ्या जिवाला काळजी वाटू देऊ नको.
19रागीट मनुष्याला दंड दिला पाहिजे; जर तुम्ही त्यास सोडवले, तर तुम्हास दुसऱ्या वेळेसही सोडवावे लागेल.
20सल्ला ऐक आणि शिक्षण स्वीकार, म्हणजे तू आपल्या आयुष्याच्या शेवटी सुज्ञान होशील.
21मनुष्याच्या मनात बऱ्याच योजना येतात, पण परमेश्वराचे उद्देश स्थिर राहतील.
22प्रामाणिकपणा ही मनुष्याची इच्छा असते; आणि खोटे बोलणाऱ्यापेक्षा गरीब चांगला.
23परमेश्वरास आदर द्या तो त्यास पात्र आहे; आणि तो जीवनाकडे नेतो, आणि ज्या कोणाकडे ते आहे तो समाधानी आहे, आणि त्याची संकटांनी हानी होणार नाही.
24आळशी आपला हात ताटात घालतो, आणि तो पुन्हा आपल्या तोंडाकडेसुद्धा घेऊन जात नाही.
25निंदकाला तडाखा मार म्हणजे भोळा समंजस होईल, बुद्धिमानाला शब्दाचा मारा कर म्हणजे त्यास ज्ञान कळेल.
26जो कोणी आपल्या पित्याला लुटतो, व आईला हाकलून लावतो, तो मुलगा लाज आणि दोष आणणारा आहे.
27माझ्या मुला, जर तू सूचना ऐकण्याचे थांबवले तर ज्ञानाच्या वचनापासून भटकशील.