8जो समजदार आहे तो आज्ञा मान्य करतो, परंतु बडबड्या मूर्खाची अधोगती होते.
9जो कोणी प्रामाणिकपणे चालतो तो सुरक्षितपणे चालतो, परंतु जो कोणी त्याचे मार्ग वाकडे करतो तो कळून येईल.
10जो कोणी डोळे मिचकावतो तो दुःखास कारण होतो, बडबड्या मूर्खाची अधोगती होते.
11नितीमानाचे मुख जीवनाचा झरा आहे, परंतु बलात्कार दुष्टाचे मुख झाकतो.
12द्वेष भांडण उत्पन्न करतो; परंतु प्रीती सर्व अपराधांवर झाकण घालते.
13विवेकशीलाच्या वाणीत ज्ञान सापडते, परंतु जो अक्कलशून्य असतो त्याच्या पाठीस काठीच योग्य आहे.
14शहाणे माणसे ज्ञान संग्रह करतात, परंतु मूर्खाचे मुख म्हणजे अरिष्ट जवळ आणते.