12द्वेष भांडण उत्पन्न करतो; परंतु प्रीती सर्व अपराधांवर झाकण घालते.
13विवेकशीलाच्या वाणीत ज्ञान सापडते, परंतु जो अक्कलशून्य असतो त्याच्या पाठीस काठीच योग्य आहे.
14शहाणे माणसे ज्ञान संग्रह करतात, परंतु मूर्खाचे मुख म्हणजे अरिष्ट जवळ आणते.
15श्रीमंताची संपत्ती हे त्याचे बळकट नगर आहे; गरिबांचा नाश त्यांच्या दारिद्र्यात होतो.