Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - गीत. - गीत. 6

गीत. 6:7-13

Help us?
Click on verse(s) to share them!
7तुझ्या बुरख्याच्या आत तुझी कानशिले डाळिंबाच्या फोडींसारखी आहेत.
8(स्त्रीचा प्रियकर स्वतःशीच बोलतो) साठ राण्या आणि ऐंशी उपपत्नी, आणि अगणित कुमारी असतील.
9पण माझे कबुतर, माझी सर्वोत्कृष्ट एकच आहे, ती तिच्या आईची एकुलती एक विशेष मुलगी आहे, आपल्या जननीची आवडती आहे. माझ्या नगरातील कन्यांनी तिला पाहिले आणि तिला आशीर्वादित म्हटले, राण्यांनी आणि उपपत्नींनीसुध्दा तिची स्तुती केली.
10ती पहाटेप्रमाणे चमकते आहे, ती चंद्रासारखी सुंदर आहे. सूर्यासारखी तेजस्वी आहे; आणि आकाशातल्या सैन्याप्रमाणे भयंकर आहे. ती पूर्णपणे आकर्षित करून घेणारी कोण आहे?
11खोऱ्यातील हिरवीगार झाडेझुडपे बघायला, द्राक्षाच्या वेली फुलल्या आहेत की काय, डाळिंबांना फुले आले आहेत की काय, ते बघायला मी आक्रोडाच्या मळ्यातून गेले.
12मी खूप आनंदीत होते, जसे मला राजपुत्राच्या रथात बसवले होते.
13(त्या स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे) मागे फिर, परत ये, हे शुलेमकरिणी परिपूर्ण स्त्री, मागे फिर, मागे फिर म्हणजे आम्ही तुला बघू शकू, (ती तरुण स्त्री प्रियकराला म्हणते) त्या परिपूर्ण स्त्रीकडे तुम्ही टक लावून का पाहता? जसे मी दोन नृत्य करणाऱ्याच्या रांगेत नृत्य करत आहे काय?

Read गीत. 6गीत. 6
Compare गीत. 6:7-13गीत. 6:7-13