5तू आपले डोळे माझ्यापासून फिरीव, त्यांनी मला घाबरे केले आहे. जो शेरडांचा कळप गिलाद पर्वताच्या बाजूवर बसला आहे त्यासारखे तुझे केस आहेत.
6ज्या मेंढ्या धुतल्या जाऊन वरती आल्या आहेत, ज्यांतल्या प्रत्येकीला जुळे आहे, आणि ज्यांतली कोणी पिल्ले वेगळी झाली नाही, त्यांच्या कळपासारखे तुझे दात आहेत.
7तुझ्या बुरख्याच्या आत तुझी कानशिले डाळिंबाच्या फोडींसारखी आहेत.