12(ती स्त्री स्वतःशीच बोलते) राजा आपल्या पलंगावर असता माझ्या जटामांसीचा सुगंध पसरला.
13माझ्या वक्षस्थळांमध्ये रात्रभर विसावलेला, माझा प्रियकर माझ्या गळ्यात असलेल्या गंधरसाच्या पुडीसारखा मला आहे.
14माझा प्रियकर एन-गेदीमधील द्राक्षाच्या मळ्याजवळील मेंदीच्या फुलांच्या गुच्छासारखा आहे.
15(तिचा प्रियकर तिच्याशी बोलतो) पाहा माझ्या प्रिये, तू किती सुंदर आहेस! तू फारच सुंदर आहेस. तुझे डोळे कबुतरासारखे आहेत.
16(तरुणी आपल्या प्रियकराशी बोलते) पाहा, माझ्या प्रियकरा, तू देखणा आहेस, तू किती देखणा आहेस. आपला बिछाना किती आल्हाददायक आणि सुखावह आहे.
17आपल्या घराच्या तुळ्या गंधसरूच्या लाकडाच्या आहेत. आणि छताचे वासे देवदारुच्या लाकडाचे आहे.