Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - गण. - गण. 10

गण. 10:17-26

Help us?
Click on verse(s) to share them!
17गेर्षोन व मरारी वंश निवासमंडपाची काळजी घेण्यासाठी होते, त्यांनी निवासमंडप खाली काढला आणि मग तो उचलून घेऊन त्यांच्या प्रवासास सुरवात केली.
18त्यानंतर, रऊबेनाच्या निशाणाखालील छावणीतील सैन्यांनी त्यांच्या प्रवासास सुरवात केली. शदेयुराचा मुलगा अलीसूर त्यांच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
19सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीयेल शिमोन वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
20रगुवेलाचा मुलगा एल्यासाप गाद वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
21कहाथींनी प्रवासास सुरवात केली. ते पवित्रस्थानातील पवित्र वस्तू घेऊन निघाले. ते पुढच्या तळावर जाऊन पोहोचेपर्यंत अगोदरच्या इतरांनी पवित्र निवासमंडप उभा करून तयार ठेवला होता.
22त्यानंतर एफ्राइम वंशाच्या निशाणाखालील छावणीतील सैन्यांनी प्रवासास सुरवात केली. अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा त्यांच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
23पदाहसुराचा मुलगा गमलीयेल मनश्शे वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
24गिदोनीचा मुलगा अबीदान बन्यामीन वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
25दान वंशाच्या निशाणाखालील सैन्यांची शेवटची छावणी होती. अम्मीशाद्दै चा मुलगा अहीएजर दान वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
26आक्रानाचा मुलगा पगीयेल आशेर वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.

Read गण. 10गण. 10
Compare गण. 10:17-26गण. 10:17-26