1तू आपल्या तारुण्याच्या दिवसातसुद्धा आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. अनर्थाचे दिवस येण्यापूर्वी, आणि तेव्हा अशी वर्षे येण्यापूर्वी तू म्हणशील, त्यामध्ये मला काही सुख नाही.
2सूर्य, चंद्र आणि तारे यांच्या प्रकाशापूर्वी अंधकार वाढेल आणि पावसानंतर काळोखे ढग परत येतील.
3त्यावेळी महालाचे पहारेकरी थरथरतील आणि बळकट मनुष्य वाकतील, आणि दळणाऱ्या स्त्रिया थांबतील कारण त्या थोड्या आहेत, आणि ज्या खिडक्यातून पाहणाऱ्या आहेत त्यांना स्पष्ट दिसणार नाही.
4त्यासमयी जेव्हा रस्त्यातील दरवाजे बंद होतील आणि जात्याचा आवाज थांबेल, तेव्हा पक्ष्याच्या शब्दाने मनुष्य बिथरेल, आणि मुलींच्या गायनाचास्वर लुप्त होईल.