Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - 1 राजे - 1 राजे 22

1 राजे 22:25-31

Help us?
Click on verse(s) to share them!
25मीखाया म्हणाला, “लवकरच आपत्ती येणार आहे. तेव्हा तू एका लहानशा खोलीत दडून बसशील तेव्हा माझे म्हणणे खरे असल्याचे तुझ्या लक्षात येईल.”
26तेव्हा इस्राएलच्या राजाने आपल्या एका सेवकाला मीखायाला पकडायचा हुकूम केला. राजा म्हणाला, “याला धरा आणि नगराधिकारी आमोन व राजपुत्र योवाश यांच्याकडे घेऊन जा.
27आणि त्यांना जाऊन सांगा, राजा म्हणतो, या मनुष्यांस बंदीत टाका व मी सुखरूप परत येईपर्यंत त्यास फक्त भाकर आणि पाणी द्या. युध्दावरुन मी परत सुखरूप येईपर्यंत त्यास तिथेच राहू द्या.”
28मीखाया मोठ्याने म्हणाला, “मी काय म्हणतो ते सर्व लोकहो ऐका. राजा, तू युध्दावरुन जिवंत परत आलास तर परमेश्वर माझ्या मार्फत बोलला नाही असे खुशाल समजा.”
29नंतर इस्राएल राजा अहाब आणि यहूदाचा राजा यहोशाफाट रामोथ येथे अरामाच्या सैन्याशी लढायला गेले. रामोथ-गिलाद प्रांतात हे युध्द झाले.
30अहाब यहोशाफाटाला म्हणाला, “आपण आता युध्दाचा व्यूह रचू. मला राजा म्हणून कोणी ओळखणार नाही असे कपडे मी घालीन. पण तू मात्र राजाला शोभेल असाच पोषाख कर.” अशाप्रकारे इस्राएलाच्या राजाने अगदी चारचौघांसारखे कपडे करून युध्दाला सुरुवात केली.
31अरामाच्या राजाकडे बत्तीस रथाधिपती होते. त्या राजाने या बत्तीस जणांना इस्राएलाच्या राजाचा शोध घ्यायला सांगितले. राजाला ठार करण्याबद्दल त्याने त्यांना बजावले.

Read 1 राजे 221 राजे 22
Compare 1 राजे 22:25-311 राजे 22:25-31