Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - 1 तीम.

1 तीम. 5

Help us?
Click on verse(s) to share them!
1वडील मनुष्यास कठोरपणे बोलू नको, उलट पित्याप्रमाणे त्यास बोध कर.
2तरुणांना भावासारखे, वृद्ध स्त्रियांना आईसारखे, तरुण स्त्रियांना बहिणीसारखे पूर्ण शुद्ध भावाने वागव.
3ज्या विधवा खरोखरीच्या गरजवंत आहेत त्यांचा सन्मान कर.
4पण जर एखाद्या विधवेला मुले किंवा नातवंडे असतील तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांशी धार्मिकतेने वागायला व आपल्या वडिलांचे उपकार फेडायला शिकावे कारण हे देवाच्या दृष्टीने चांगले आहे.
5तर जी खरोखरी विधवा आहे व तिची काळजी घेण्यासाठी कोणी नाही तिने देवावर आपली आशा ठेवली आहे व ती रात्रंदिवस देवाकडे प्रार्थना व विनंत्या करीत राहते.
6पण जी विधवा चैनीत राहते, ती जिवंत असता मरण पावलेली आहे.
7त्यांनी निर्दोष व्हावे म्हणून त्यांना या गोष्टी आज्ञारूपाने लोकांस सांग
8पण जर कोणी त्याच्या स्वतःच्या नातेवाईकासाठी आणि विशेषतः त्याच्या कुटुंबातील जवळच्यांसाठी तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारलेला आहे व तो अविश्वासू मनुष्यापेक्षा वाईट आहे.
9जी विधवा साठ वर्षाच्या आत असून एकाच पतीची स्त्री झाली असेल.
10जी चांगल्या कृत्यांसाठी नावाजलेली असेल म्हणजे जिने मुलाबाळांना वाढवले असेल, जिने अनोळखी लोकांचे स्वागत केले असेल, पवित्रजनांचे पाय धुतले असतील, त्रासात असलेल्यांना मदत केली असेल व सर्व चांगले काम करण्यात स्वतःला वाहून घेतले असेल, अश्या विधवांचा यादीत समावेश करावा.
11पण तरुण विधवांची यादीत नोंद करण्याचे टाळावे कारण जेव्हा त्या ख्रिस्ताला सोडून अविचारी होतात, तेव्हा त्यांना पुन्हा लग्न करावेसे वाटते.
12आणि त्या दोषी धरल्या जातील, कारण त्यांनी त्यांचा पहिला विश्वास टाकून दिला.
13आणखी त्या घरोघरी फिरून आळशी बनतात व एवढेच नाही तर वटवट्या व लुडबुड्या होऊन ज्या गोष्टी बोलू नयेत, त्या गोष्टी बोलतात.
14यासाठी माझी अशी इच्छा आहे की, तरुण विधवा स्त्रियांनी लग्न करावे. मुलांचे संगोपन करावे व आपले घर चालवावे. आपल्या विरोधकाला आपली निंदा करण्यास वाव मिळू देऊ नये.
15मी तर असे म्हणतो कारण काही विधवा सैतानामागे जाण्यासाठी वळल्यादेखील आहेत.
16जर एखाद्या विश्वास ठेवणाऱ्या स्त्रीच्या घरात विधवा असतील तर तिने त्यांची काळजी घ्यावी व मंडळीवर भार टाकू नये. यासाठी की ज्या विधवा खरोखरच गरजवंत आहेत त्यांना ते मदत करू शकतील.
17जे उपदेश करण्याचे व शिकविण्याचे काम करतात त्यांना व वडील मंडळीची चांगली सेवा करतात त्यांना दुप्पट मान देण्याच्या विशेष योग्यतेचे समजावे.
18कारण शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे, “धान्याची मळणी करताना बैलाला मुसक्या बांधू नको” आणि “मजुराचा त्याच्या मजुरीवर हक्क आहे.”

19दोन किंवा तीन साक्षीदारांनी पाठिंबा दिल्याशिवाय सेवकावरील आरोप दाखल करू नकोस.
20जे पाप करीत राहतात त्यांचा जाहीरपणे निषेध कर. यासाठी की, इतरांनाही भय वाटावे.
21देव, येशू ख्रिस्त व निवडलेले देवदूत यांच्यासमोर मी निक्षून आज्ञा करतो की, तू कोणताही पूर्वग्रह न ठेवता या गोष्टी पाळ व पक्षपाताने काहीही करू नको.
22घाईने कोणावर हात ठेऊ नको आणि इतरांच्या पापांत वाटेकरी होऊ नको. नेहमी स्वतःला शुद्ध राख.
23ह्यापुढे पाणीच पीत राहू नको, तर आपल्या पोटासाठी, म्हणजे आपल्या वारंवार होणाऱ्या आजारामुळे, थोडासा द्राक्षरस घेत जा.
24कित्येक मनुष्यांची पापे उघड असून ती अगोदर न्यायनिवाड्याकरता जातात आणि कित्येकांची मागून जातात.
25त्याचप्रमाणे, चांगली कामेही स्पष्ट आहेत ती सुद्धा कायमची लपवता येत नाहीत.