Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 35:13-21 in Marathi

Help us?

स्तोत्र. 35:13-21 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 परंतू जेव्हा ते आजारी पडले मी तर गोणताट परीधान केले, मी त्यांच्या करता उपवास केला, मी प्रार्थना केली पण त्यांचे उत्तम मिळाले नाही.
14 मी त्याच्याकरिता शोक केला जणू काय तो माझा भाऊ आहे. मी खाली लवून विलाप केला जशी ती माझी आई आहे.
15 परंतु मी अडखळलो असता, त्यांनी एकत्र येऊन हर्ष केला. मला माहित नसता ते माझ्याविरूद्ध एकत्र जमले.
16 आदर न बाळगता त्यांनी माझी थट्ट केली. त्यांनी आपले दातओठ माझ्यावर खाल्ले.
17 परमेश्वरा, तू किती वेळ नुसता बघत राहाणार आहेस? माझा जीव नाश करणाऱ्या हल्यांपासून आणि माझे जीवन सिंहापासून वाचव.
18 मोठ्या सभेत मी तुझी स्तुती करेन. लोकांमध्ये मी तुझी स्तुती करेन.
19 माझ्या शत्रूंस अन्यायाने माझ्यावर हर्ष करू देऊ नको.
20 कारण ते शांतीने बोलत नाही, परंतु ते देशातील शांततापूर्ण असणाऱ्यांविरूद्ध कपटाच्या गोष्टी बोलतात.
21 ते आपले मुख माझ्याविरोधात उघडतात, ते म्हणतात, अहाहा, अहाहा, आमच्या डोळ्यांने हे पाहिले आहे.
स्तोत्र. 35 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी