Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 35

स्तोत्र. 35:13-21

Help us?
Click on verse(s) to share them!
13परंतू जेव्हा ते आजारी पडले मी तर गोणताट परीधान केले, मी त्यांच्या करता उपवास केला, मी प्रार्थना केली पण त्यांचे उत्तम मिळाले नाही.
14मी त्याच्याकरिता शोक केला जणू काय तो माझा भाऊ आहे. मी खाली लवून विलाप केला जशी ती माझी आई आहे.
15परंतु मी अडखळलो असता, त्यांनी एकत्र येऊन हर्ष केला. मला माहित नसता ते माझ्याविरूद्ध एकत्र जमले.
16आदर न बाळगता त्यांनी माझी थट्ट केली. त्यांनी आपले दातओठ माझ्यावर खाल्ले.
17परमेश्वरा, तू किती वेळ नुसता बघत राहाणार आहेस? माझा जीव नाश करणाऱ्या हल्यांपासून आणि माझे जीवन सिंहापासून वाचव.
18मोठ्या सभेत मी तुझी स्तुती करेन. लोकांमध्ये मी तुझी स्तुती करेन.
19माझ्या शत्रूंस अन्यायाने माझ्यावर हर्ष करू देऊ नको.
20कारण ते शांतीने बोलत नाही, परंतु ते देशातील शांततापूर्ण असणाऱ्यांविरूद्ध कपटाच्या गोष्टी बोलतात.
21ते आपले मुख माझ्याविरोधात उघडतात, ते म्हणतात, अहाहा, अहाहा, आमच्या डोळ्यांने हे पाहिले आहे.

Read स्तोत्र. 35स्तोत्र. 35
Compare स्तोत्र. 35:13-21स्तोत्र. 35:13-21