Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 14:1-5 in Marathi

Help us?

स्तोत्र. 14:1-5 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र. मूर्ख आपल्या हृदयात म्हणतो, “देव नाही.” ते भ्रष्ट झाले आहेत आणि त्यांनी घृणास्पद अशी पापे केली आहेत. चांगले करणारा कोणीच नाही.
2 परमेश्वर स्वर्गातून खाली मनुष्य संतानास पाहतो की, कोणी एखादा तरी समजणारा आणि त्याच्यामागे चालणारा आहे काय?
3 प्रत्येकजण बहकून गेला आहे, ते सर्व गलिच्छ झाले आहेत. सत्कर्म करणारा कोणीही नाही, एकही नाही.
4 जे अन्याय करतात त्यांना काहीच ज्ञान नाही काय? ते भाकरी खातात तसे माझ्या लोकांस खातात; ते परमेश्वरास हाक मारत नाहीत?
5 परंतु ते भीतीने थरथर कापतील, कारण देव न्यायींच्या सभेत आहे.
स्तोत्र. 14 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी