Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - स्तोत्र. - स्तोत्र. 14

स्तोत्र. 14:1-5

Help us?
Click on verse(s) to share them!
1मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र. मूर्ख आपल्या हृदयात म्हणतो, “देव नाही.” ते भ्रष्ट झाले आहेत आणि त्यांनी घृणास्पद अशी पापे केली आहेत. चांगले करणारा कोणीच नाही.
2परमेश्वर स्वर्गातून खाली मनुष्य संतानास पाहतो की, कोणी एखादा तरी समजणारा आणि त्याच्यामागे चालणारा आहे काय?
3प्रत्येकजण बहकून गेला आहे, ते सर्व गलिच्छ झाले आहेत. सत्कर्म करणारा कोणीही नाही, एकही नाही.
4जे अन्याय करतात त्यांना काहीच ज्ञान नाही काय? ते भाकरी खातात तसे माझ्या लोकांस खातात; ते परमेश्वरास हाक मारत नाहीत?
5परंतु ते भीतीने थरथर कापतील, कारण देव न्यायींच्या सभेत आहे.

Read स्तोत्र. 14स्तोत्र. 14
Compare स्तोत्र. 14:1-5स्तोत्र. 14:1-5