Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - लेवी. - लेवी. 22

लेवी. 22:14-18

Help us?
Click on verse(s) to share them!
14एखाद्याने चुकून पवित्र पदार्थ खाल्ला तर त्याने त्या खाल्लेल्या पदार्थाइतकी व त्या पदार्थाच्या पाचव्या हिश्श्याइतकी किंमत भरपाई म्हणून त्यामध्ये घालून याजकास द्यावी.
15इस्राएल लोक परमेश्वरास अर्पणे देतात तेव्हा ती अर्पणे पवित्र होतात, म्हणून ती पवित्र अर्पणे याजकाने अपवित्र करु नयेत;
16जर याजकांनी त्यांना पवित्र अर्पणे खाण्याची परवानगी दिली तर ते स्वत:वर अपराध ओढवून घेतील. आणि त्या अपराधाबद्दल त्यांना पैसे भरावे लागतील. मी परमेश्वर त्यांना पवित्र करणारा आहे!
17मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
18अहरोन, त्याचे पुत्र व सर्व इस्राएल लोक ह्याना सांग की तुम्हा इस्राएल लोकांपैकी किंवा तुम्हामध्ये राहणाऱ्या उपरी लोकांपैकी कोणाला आपल्या नवसाचा किंवा काही विशेष कारणासाठी स्वखुशीचा परमेश्वरासाठी यज्ञबली अर्पावयाचा असेल,

Read लेवी. 22लेवी. 22
Compare लेवी. 22:14-18लेवी. 22:14-18