Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - लेवी. - लेवी. 19

लेवी. 19:11-25

Help us?
Click on verse(s) to share them!
11तुम्ही चोरी करु नये. कोणाला फसवू नये. एकमेकाशी कपटाने बोलू नये.
12तुम्ही माझ्या नावाने खोटी शपथ वाहून आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नये. मी परमेश्वर आहे!
13आपल्या शेजाऱ्यावर जुलूम करु नका व त्यास लुबाडू नका; मजुराची मजुरी रात्रभर दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नका.
14बहिऱ्याला शिव्याशाप देऊ नका; आंधळ्याने ठोकर लागून पडावे म्हणून एखाद्या वस्तूचे अडखळण त्याच्या वाटेत ठेवू नका; पण आपल्या देवाचा मान राखा त्याचे भय बाळगा. मी परमेश्वर आहे!
15न्यायनिवाडा करताना कोणावर अन्याय करु नका तर योग्य न्याय द्या. न्यायदान करताना गरीब लोक व वजनदार लोक ह्याना विशेष मर्जी दाखवू नका. आपल्या शेजाऱ्याचा न्याय करताना योग्य तोच न्याय द्या.
16आपल्या लोकांमध्ये चहाड्या करीत इकडे तिकडे फिरू नका, आपल्या शेजाऱ्याचा जीव धोक्यात येईल असे काही करु नका. मी परमेश्वर आहे!
17आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगू नका; आपल्या शेजाऱ्याने चुकीचे काही कृत्य केल्यास त्याची कान उघडणी करावी, परंतु त्याच्या अपराधामध्ये सहभागी होऊ नये.
18लोकांनी तुमचे वाईट केलेले विसरून जावे, त्याबद्दल सूड घेण्याचा प्रयत्न करु नका तर आपल्या शेजाऱ्यावर स्वत: सारखी प्रीती करा. मी परमेश्वर आहे!
19तुम्ही माझे नियम पाळा. आपल्या पशूंचा भिन्न जातीच्या पशूंशी संकर करु नका. दोन जातीचे बी मिसळून ते आपल्या शेतात पेरू नका. भिन्न सूत एकत्र करून विणलेला कपडा अंगात घालू नका.
20एखाद्या पुरुषाची स्त्री गुलाम, ती विकत घेतलेली नसेल किंवा खंडणी भरून मुक्त झाली नसेल, अशा स्त्रीशी कोणी शरीरसंबंध केल्यास त्या दोघांना शिक्षा व्हावी; परंतु तिची मुक्तता झाली नसल्यामुळे त्यांना जिवे मारू नये.
21हे पाप केलेल्या मनुष्याने आपले दोषार्पण म्हणून एक मेंढा दोषार्पणासाठी, दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर आणावा;
22आणि त्याने केलेल्या पापाबद्दल दोषार्पणाच्या मेंढ्याद्वारे त्याच्यासाठी याजकाने परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे; म्हणजे त्याने केलेल्या पापाची त्यास क्षमा होईल.
23तुम्ही आपल्या देशात जाऊन पाहोचल्यावर खाण्यासाठी निरनिराळ्या प्रकारची फळझाडे लावाल, तेव्हा फळझाडे लावल्यावर तुम्ही तीन वर्षे थांबाबे, त्यांची फळे खाऊ नयेत.
24पण चौथ्या वर्षी त्यांची सर्व फळे परमेश्वराची होतील; ती परमेश्वराच्या उपकारस्मरणाच्या यज्ञासाठी पवित्र समजावी.
25मग पाचव्या वर्षी तुम्ही त्यांची फळे खावी. असे केल्याने त्यांना तुमच्यासाठी अधिक फळे येतील. मी तुमचा देव परमेश्वर आहे!

Read लेवी. 19लेवी. 19
Compare लेवी. 19:11-25लेवी. 19:11-25