10तू तुझ्या नातीशी शारीरिक संबंध ठेवू नको, मग ती तुझ्या मुलाची मुलगी असो किंवा मुलीची मुलगी असो; कारण ती तुझीच लाज आहे!
11जर तुझ्या वडिलाच्या पत्नीला तुझ्या बापापासून मुलगी झाली असेल तर ती तुझी बहीणच आहे; म्हणून तू तिच्याशी शारीरिक संबंध ठेवू नको.
12तुझ्या आत्याशी शारीरिक संबंध ठेवू नको. ती तुझ्या बापाची जवळची नातलग आहे.
13तुझ्या मावशीशी शारीरिक संबंध ठेवू नको, ती तुझ्या आईची जवळची नातलग आहे.
14तू तुझ्या चुलत्याच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवून त्याची लाज उघडी करु नको त्या हेतूने तिच्या जवळ जाऊ नको; ती तुझी चुलती आहे.