Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - योहा. - योहा. 19

योहा. 19:17-25

Help us?
Click on verse(s) to share them!
17तेव्हा त्यांनी येशूला आपल्या ताब्यात घेतले आणि तो आपला वधस्तंभ स्वतः वाहत ‘कवटीचे’ स्थान म्हटलेल्या जागी गेला. या जागेला इब्री भाषेत गुलगुथा म्हणतात.
18तेथे त्यांनी त्यास व त्याच्याबरोबर दुसर्‍या दोघांना, एकाला एका बाजूस व दुसऱ्याला दुसऱ्या बाजूस आणि येशूला मध्ये असे वधस्तंभांवर खिळले.
19आणि पिलाताने एक फलक लिहून तो वधस्तंभावर लावला; ‘यहूद्यांचा राजा नासोरी येशू’ असे लिहिले होते.
20येशूला वधस्तंभावर खिळले होते ते ठिकाण नगराच्या जवळ होते. म्हणून पुष्कळ यहूद्यांनी तो फलक वाचला. तो इब्री, रोमी व ग्रीक भाषांत लिहिला होता.
21तेव्हा यहुद्यांचे मुख्य याजक लोक पिलाताला म्हणाले, “यहूद्यांचा राजा असे लिहू नका तर याने म्हणले ‘मी यहूद्यांचा राजा आहे’ असे लिह.”
22पिलाताने उत्तर दिले, “मी लिहिले ते लिहिले.”
23मग शिपायांनी येशूला वधस्तंभावर खिळल्यावर त्याचे कपडे घेतले आणि प्रत्येक शिपायाला एक वाटा असे चार वाटे केले; आणि झगाही घेतला. या झग्याला शिवण नव्हती; तो वरपासून सरळ विणलेला होता.
24म्हणून ते एकमेकांना म्हणाले, “आपण हा फाडू नये; पण तो कोणाला मिळेल हे ठरवण्याकरता चिठ्ठ्या टाकून पाहावे.” हे यासाठी झाले की, ‘त्यांनी माझे कपडे आपसात वाटून घेतले आणि माझ्या झग्यावर त्यांनी चिठ्ठ्या टाकिल्या,’ असा हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा; म्हणून शिपायांनी या गोष्टी केल्या.
25पण येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी व क्लोपाची पत्नी मरीया आणि मग्दालीया नगराची मरीया या उभ्या होत्या.

Read योहा. 19योहा. 19
Compare योहा. 19:17-25योहा. 19:17-25