Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - प्रेषि. - प्रेषि. 15

प्रेषि. 15:16-24

Help us?
Click on verse(s) to share them!
16ह्यानंतर मी परत येईन व दावीदाचा पडलेला मंडप पुन्हा उभारीन; आणि त्याची भगदाडे बुजवून तो पुन्हा नीट करीन,
17ह्यासाठी की, शेष राहिलेल्या मनुष्यांनी व ज्या राष्ट्रांना माझे नाव देण्यात आले आहे त्या सर्वांनी प्रभूचा शोध करावा.
18हे जे त्यास युगादीपासून माहीत आहे ते करणारा प्रभू असे म्हणतो.
19तेव्हा माझे तर मत असे आहे की, जे परराष्ट्रीयांतून देवाकडे वळतात त्यांना त्रास देऊ नये;
20तर त्यांना असे लिहून पाठवावे की, मूर्तीचे अमगंळपण, जारकर्म, गळा दाबून मारलेले प्राणी व रक्त ह्याच्यापासून तुम्ही अलिप्त असा.
21कारण प्राचीन काळापासून प्रत्येक शब्बाथ दिवशी सभास्थानात मोशेचे पुस्तक वाचून दाखवून त्याची घोषणा करणारे लोक प्रत्येक नगरांत आहेत.
22तेव्हा पौल व बर्णबा ह्यांच्याबरोबर आपणातून निवडलेली माणसे म्हणजे बंधुजनांतील प्रमुख बर्शब्बा म्हटलेला यहूदा व सीला ह्यांना अंत्युखियास पाठवले तर बरे होईल असे सर्व मंडळीसह प्रेषित आणि वडील ह्यांना वाटले.
23त्यांच्या हाती त्यांनी असे लिहून पाठवलेः “अंत्युखिया, सिरीया व किलकिया येथील परराष्ट्रीयांतले बंधुजन ह्यांना प्रेषित व वडीलवर्ग या बंधुजनांचा सलाम.
24आमच्यापैकी काहींना जाऊन आपल्या बोलण्याने तुमचे जीव घोटाळ्यात पाडून त्रास दिला असे आमच्या कानी आले आहे; पण त्यांना आम्ही तसे करावयाला सांगितले नव्हते.

Read प्रेषि. 15प्रेषि. 15
Compare प्रेषि. 15:16-24प्रेषि. 15:16-24