Text copied!
Bibles in Marathi

नीति. 7:6-19 in Marathi

Help us?

नीति. 7:6-19 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 माझ्या घराच्या खिडकीजवळील जाळ्यातून मी बाहेर पाहिले;
7 आणि मी पुष्कळ भोळे तरुण पाहिले. मला तरुणांमध्ये एक तरुण दिसला, जो बुद्धिहीन मनुष्य होता.
8 तो तरुण मनुष्य तिच्या कोपऱ्याजवळून जाणाऱ्या वाटेने जात होता, आणि तो तिच्या घराकडे,
9 त्या दिवशी संध्याकाळी संधीप्रकाशात, रात्रीच्यावेळी आणि अंधकारात गेला.
10 आणि तेथे ती स्त्री त्यास भेटली, वेश्येसारखा पोशाख केलेली आणि ती तेथे कशासाठी आहे हे तिला माहित होते.
11 ती वाचाळ व स्वच्छंदी असून, तिचे पाय घरी राहत नाही;
12 कधी रस्त्यात, कधी बाजारात, प्रत्येक नाक्याजवळ ती थांबून राहते.
13 मग तिने त्यास धरले आणि त्याची चुंबने घेतली; निर्लज्जपणे ती त्यास म्हणाली,
14 “आज मी माझी शांत्यर्पणे केली; मी आपले नवस फेडले,
15 ह्यासाठी मी तुला भेटायला, तुझे मुख पाहायला उत्सुकतेने बाहेर आले आणि तू मला सापडला आहेस.
16 मी आपल्या अंथरुणावर, मिसरातली रंगीत सुती चादर पसरली आहे.
17 मी आपले अंथरुण बोळ, अगरू, दालचिनी यांनी सुवासिक केली आहे.
18 ये, आपण सकाळपर्यंत प्रीतीने भरून तृप्त होऊ; आपण वेगवेगळ्या कृतींनी प्रेम करून महान आनंद घेऊ.
19 माझा पती घरी नाही; तो लांबच्या प्रवासास गेला आहे.
नीति. 7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी