Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - नीति. - नीति. 7

नीति. 7:6-19

Help us?
Click on verse(s) to share them!
6माझ्या घराच्या खिडकीजवळील जाळ्यातून मी बाहेर पाहिले;
7आणि मी पुष्कळ भोळे तरुण पाहिले. मला तरुणांमध्ये एक तरुण दिसला, जो बुद्धिहीन मनुष्य होता.
8तो तरुण मनुष्य तिच्या कोपऱ्याजवळून जाणाऱ्या वाटेने जात होता, आणि तो तिच्या घराकडे,
9त्या दिवशी संध्याकाळी संधीप्रकाशात, रात्रीच्यावेळी आणि अंधकारात गेला.
10आणि तेथे ती स्त्री त्यास भेटली, वेश्येसारखा पोशाख केलेली आणि ती तेथे कशासाठी आहे हे तिला माहित होते.
11ती वाचाळ व स्वच्छंदी असून, तिचे पाय घरी राहत नाही;
12कधी रस्त्यात, कधी बाजारात, प्रत्येक नाक्याजवळ ती थांबून राहते.
13मग तिने त्यास धरले आणि त्याची चुंबने घेतली; निर्लज्जपणे ती त्यास म्हणाली,
14“आज मी माझी शांत्यर्पणे केली; मी आपले नवस फेडले,
15ह्यासाठी मी तुला भेटायला, तुझे मुख पाहायला उत्सुकतेने बाहेर आले आणि तू मला सापडला आहेस.
16मी आपल्या अंथरुणावर, मिसरातली रंगीत सुती चादर पसरली आहे.
17मी आपले अंथरुण बोळ, अगरू, दालचिनी यांनी सुवासिक केली आहे.
18ये, आपण सकाळपर्यंत प्रीतीने भरून तृप्त होऊ; आपण वेगवेगळ्या कृतींनी प्रेम करून महान आनंद घेऊ.
19माझा पती घरी नाही; तो लांबच्या प्रवासास गेला आहे.

Read नीति. 7नीति. 7
Compare नीति. 7:6-19नीति. 7:6-19