6तू आपल्या हृदयावर शिक्क्याप्रमाणे, आपल्या बाहूवर शिक्क्यासारखी मला ठेव. कारण प्रेम मृत्यूसारखेच शक्तीशाली आहे. प्रेमसंशय मृतलोकासारखा कठोर आहे. त्याची ज्वाला, अग्नीज्वालेसारखी, किंबहुना प्रदीप्त केलेला तो अग्नीच आहे.
7असले प्रेम महाजलांच्यानेही विझवणार नाही. महापुरांनी तिला बुडवून टाकिता येणार नाही. जरी मनुष्याने प्रेमासाठी आपल्या घरची सगळी संपत्ती दिली तरी, ती त्यापुढे अगदी तुच्छ होय.
8(त्या तरुण स्त्रीचा बंधू त्यांच्या विषयी बोलतो) आम्हास एक लहान बहीण आहे, आणि तिच्या वक्षस्थळांची अजून पूर्ण वाढ झालेली नाही. आमच्या या बहिणीस लग्नाची मागणी होईल त्या दिवशी आम्ही काय करावे?