4(ती स्त्री दुसऱ्या स्त्रीशी बोलते) यरूशलेमेच्या कन्यांनो, मी तुम्हास शपथ घालते. माझ्या प्रेमानंदात व्यत्यय आणू नका. समाधान होईपर्यंत राहू द्या.
5(यरूशलेमेतील स्त्री बोलते) आपल्या प्रियकरावर टेकत रानातून येणारी ही स्त्री कोण आहे? (ती तरूण स्त्री आपल्या प्रियकराशी बोलते) मी तुला सफरचंदाच्या झाडाखाली उठवले, तेथे तुझ्या आईने तुझे गर्भधारण केले, तेथे तिने तुला जन्म दिला, ती तुला प्रसवली.