6अगे प्रिये, आनंदाकरता तू किती सुंदर आहेस व किती गोड आहेस.
7तुझी उंची खजुरीच्या झाडासारखी आणि तुझे वक्ष त्याच्या फळांच्या घोसासारखे आहेत.
8मी विचार केला, मी खजुरीच्या झाडावर चढेन, त्याच्या फांद्यांना धरीन. तुझी वक्षस्थळे द्राक्षाच्या घोसासारखी आणि तुझ्या श्वासाचा सुगंध सफरचंदासारखा असू दे.
9तुझे चुंबन सर्वात उंची द्राक्षरसाप्रमाणे आहे. तो घशात नीट उतरतो व झोपलेल्यांच्या ओठांवरून सहज गळतो.
10(ती तरुण स्त्री आपल्या प्रियकराबरोबर बोलते) मी आपल्या प्रियकराची आहे, त्याचे मन माझ्यावर बसले आहे.
11माझ्या प्रियकरा, ये आपण बाहेर पटांगणांत जाऊ. आपण खेड्यात रात्र घालवू.
12आपण सकाळी लवकर उठून द्राक्षाच्या मळ्यात जाऊ. द्राक्षाच्या वेली फुलल्या आहेत की नाहीत ते पाहू. आणि जर डाळिंब बहरत असतील तर प्रियकरा, तेथे मी तुला माझे प्रेम अर्पण करीन.