Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - गीत. - गीत. 5

गीत. 5:5-11

Help us?
Click on verse(s) to share them!
5माझ्या प्रियकराला दार उघडायला मी उठले. तेव्हा माझ्या हातास दाराच्या कडीवरील गंधरस लागला. माझ्या बोटांवरून त्याचा द्रव गळत होता.
6मी माझ्या प्रियकरासाठी दार उघडले. पण माझा प्रियकर तोंड फिरवून निघून गेला होता. तो गेला तेव्हा माझा जीव गळून गेला. मी त्यास शोधले पण तो मला सापडला नाही. मी त्यास हाक मारली पण त्याने मला उत्तर दिले नाही.
7शहरावर पहारा करणाऱ्या पहारेकऱ्यांना मी दिसले. त्यांनी मला मारले, जखमी केले. कोटावरच्या पहारेकऱ्यांनी माझा अंगरखा घेतला.
8(ती स्त्री त्या शहरातील स्त्रियांशी बोलत आहे) यरूशलेमेच्या कन्यांनो! मी तुम्हास शपथ घालून सांगते, जर तुम्हास माझा प्रियकर सापडला, तर कृपाकरून त्यास सांगा की, मी प्रेमामुळे आजारी झाले आहे.
9(त्या शहरातील स्त्रिया त्या तरुणीशी बोलत आहेत) अगे स्त्रियांतील सर्वात सुंदरी! तुझा प्रियकर इतर प्रियकरांहून अधिक चांगला आहे तो कसा काय? तू आम्हास अशी शपथ घालतेस तर तुझ्या प्रियकरांत इतरांपेक्षा अधिक ते काय आहे?
10(तरुणी त्या शहरातील स्त्रियांशी बोलत आहेत) माझा प्रियकर गोरापान व लालबुंद आहे. तो दहा हजारात श्रेष्ठ आहे.
11त्याचे मस्तक शुध्द सोन्याप्रमाणे आहे. त्याचे केस कुरळे आहेत आणि डोंमकावळ्यासारखे काळे आहेत.

Read गीत. 5गीत. 5
Compare गीत. 5:5-11गीत. 5:5-11