13तुझी रोपे मोलवान फुले असलेला डाळिंबाचा मळा अशी आहेत. त्यामध्ये कापराची व जटामांसीची झाडे,
14मेंदी, जटामांसी, केशर, वेखंड व दालचिनी इत्यादींनी भरलेल्या बागेसारखे आहेत. तुझे अवयव उदाची झाडे, गंधरस व अगरू व इतर सुगंधी झाडांनी भरलेल्या बागेसारखे आहेत.
15तू बागेतल्या कारंज्यासारखी, ताज्या पाण्याच्या विहिरीसारखी, लबानोनाच्या पर्वतावरुन वाहात जाणाऱ्या पाण्यासारखी आहेस.