10माझ्या प्रिये, माझ्या वधू, तुझे प्रेम फार सुंदर आहे. तुझे प्रेम द्राक्षरसापेक्षा चांगले आहे. तुझ्या अत्तराचा वास इतर सुगंधी द्रव्यापेक्षा चांगला आहे.
11माझ्या वधू, तुझ्या ओठातून मध गळतो. तुझ्या जिभेखाली मध आणि दूध आहे. तुझ्या कपड्यांना लबानोनाच्या वासासारखा गोड सुवास आहे.
12माझ्या प्रिये, माझ्या वधू, तू तर बंद केलेल्या बागेसारखी आहेस. तू बंद असलेल्या झऱ्यासारखी, शिक्का मारलेल्या कारंज्यासारखी आहेस.
13तुझी रोपे मोलवान फुले असलेला डाळिंबाचा मळा अशी आहेत. त्यामध्ये कापराची व जटामांसीची झाडे,