6(ती स्त्री स्वतःशी बोलते) त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली आहे आणि त्याचा उजवा हात मला आलिंगन देत आहे.
7(ती स्त्री दुसऱ्या स्त्रीशी बोलत आहे) यरूशलेमेच्या कन्यांनो, तुम्हास वनातील हरीणीची आणि रानमृगांची शपथ घालून सांगते की, आमचे प्रेम करणे होईपर्यंत तुम्ही व्यत्यय आणू नका.
8(ती स्त्री स्वतःशी बोलत आहे) मी माझ्या प्राणप्रियाचा आवाज ऐकत आहे. तो येत आहे, डोंगरावरुन उड्या मारत, टेकड्यांवरुन बागडत येत आहे.